Share

IPL AUCTION 2022: ‘चेरी ऑन द टॉप’; दीपक चहर ठरला इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने ‘चेरी’ म्हणजेच दीपक चहरला खरेदी करण्यासाठी दिलखुलास खर्च केला आहे. दीपक चहरला १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. चहर रवींद्र जडेजा आणि जयदेव उनाडकट यांना मागे टाकत आयपीएलऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज बनला. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी चहर दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. मुंबईने ईशान किशनला १५. २५ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

२०१८ च्या मेगा ऑक्शनमध्ये चहरला CSK ने खरेदी केले होते. त्याने एम एस धोनीच्या कर्णधारपदाखाली आयपीएलमध्ये पुणे सुपर जायंट्स सोबत चहरने पदार्पण केले होते. त्याच्या IPL कारकिर्दीतील पहिल्या दोन हंगामात पुण्यासाठी विकेट घेण्यात तो अपयशी ठरला होता. मात्र तो स्पर्धेच्या २०१८ सीजनपासून CSK साठी सुपरस्टार बनला आहे. चहरने आयपीएल २०१८ मध्ये १० विकेट्ससह घेतल्या. २०२१ च्या विजेतेपदाच्या हंगामात फ्रँचायझीसाठी १४ विकेट्स घेतल्या.

जगातील सर्वात मोठ्या टी २० लीग म्हणजेच CSK कडून दाखवणाऱ्या चहरने २०१८ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने १७ टी २० सामने खेळले आहेत. तसेच 23 विकेट्स हि घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी सात एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत ज्यात १० विकेट्स घेत १७९ धावा केल्या आहेत. दीपक चहर एक अष्टपैलू गोलंदाज आहे. त्याने वेळ प्रसंगी संघाला बॅट आणि बॉलने सामने जिंकून दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!