🕒 1 min read
बंगळुरू: IPL 2022 चा पहिला दिवसाचा ऑक्शन पुर्ण झाला आहे. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (MI) ईशान किशनला १५. ७५ कोटीत विकत घेतले आणि तो ऑक्शनमध्ये विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनला आहे. दीपक चहर हा या ऑक्शनमध्ये विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला १४ कोटीत खरेदी केले.
आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडू सोल्ड झाले. ज्यात २० परदेशी खेळाडू आहेत. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी तीनशे अठ्ठ्यासी कोटी दहा लाख रुपयांची मोठी उलाढाल झालेली आहे. सर्व दहा फ्रँचायझींना सेट १८ नंतर होणार्या स्पीड ऑक्शनसाठी प्रत्येकी२० खेळाडूंची आणि पहिल्या १६१ खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे.
पहिल्या दिवसाच्या शेवटानंतर आता संघाकडे पुढील प्रमाणे पैसे शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्स (CSK) – २०.४५ कोटी ,दिल्ली कॅपिटल्स (DC) – १६.५ कोटी , गुजरात टायटन्स (GT) – १८. ८५ कोटी , कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – १२.६५ कोटी , लखनऊ सूपरजाईंनट्स (LSG) – ६.९० कोटी , मुंबई इंडियन्स (MI) – २९.४५ कोटी , पंजाब किंग्स (PBKS) – २८.६५ कोटी , राजस्थान रॉयल्स (RR) – १२. १५ कोटी,
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) – ९. २५ कोटी हैद्राबाद (SRH) – २०.३५ कोटी
महत्वाच्या बातम्या
- “पूर्वी बाळासाहेबांच्या आणि आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण”
- “१० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल” – चंद्रकांत पाटलांची पुनरावृत्ती
- बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवेतील स्मारक तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे – राष्ट्रपती
- IPL AUCTION 2022: हर्षल पटेलची जादू पुन्हा बँगलोरसोबत चालणार
- सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड! – नाना पटोले


