🕒 1 min read
पणजी: भारतीय निवडणूक आयोगाने देशातली पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या पाच राज्यात राजकरण चांगलेच पेटले आहे. गोवा राज्यात २०१२ पासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. गोवा राज्यात भारतीय जनता पक्षाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी आघाडी केली आहे.
कालच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोवा राज्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर आज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोवा राज्यासाठी शिवसेनेचा डिजिटल स्वरूपात जाहीरनामा प्रसिद्ध केला.
इतके वर्ष आमची भारतीय जनता पक्षाबरोबर मैत्री होती म्हणून आम्ही गोवा राज्यावर लक्ष केंद्रित केले नव्हते, मात्र आता आम्ही गोवा राज्यातील एकूण एक निवडणूक लढवणार आहोत असेही आदित्य ठाकरे आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती आज शिवसेनेचा गोवा राज्यासाठी जाहीरनामा डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि,” केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाने गोवा राज्याच्या विकासासाठी काहीच केले नसल्याची टीका आज आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली. गोव्याचा कायापालट करायचा असेल तर तुम्हाला शिवसेनेला साथ द्यावी लागेल, अशी विनंती यावेळी आदित्य यांनी गोव्याच्या जनतेला केली.
महत्वाच्या बातम्या :
- शाईफेक प्रकरणातील आरोपींना पोलिसांची मारहाण; नवनीत राणा यांचा आरोप
- सोलापुरात विनाहेल्मेट फिरणाऱ्या १७ पोलिसांवर कारवाई
- केंद्र सरकारच्या PLI योजनेत TATA, Mahindra आणि Hyundai गाड्यांची निवड; Maruti यादीबाहेर
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट- गोपीचंद पडळकर
- अरविंद केजरीवाल आजपासून पंजाब दौऱ्यावर


