Share

केंद्र सरकारच्या PLI योजनेत TATA, Mahindra आणि Hyundai गाड्यांची निवड; Maruti यादीबाहेर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत सरकारने स्वच्छ इंधनांच्या वाहनात वाढ करण्यासाठी PLI योजने अंतर्गत भारतातील २० कार उत्पादक कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रामुख्याने टाटा, महिंद्रा आणि Hyundai कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या ऑटोमोबाइल ऑटो कॉम्पोनेंट क्षेत्रांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेनटीव्ह (PLI) करणाऱ्या कंपन्या आहेत. या योजनेसाठी एकूण ११५ कंपन्यांचे अर्ज आले होते त्यातील २० कंपन्यांवर शिक्का मोर्तब केला गेला.

देशातील सर्वात मोठी चार चाकी वाहन निर्माती कंपनी मारुतीला मात्र मोठा झटका मिळाला आहे. मारुती या यादीतून हद्दपार केली गेली आहे. प्राप्त माहितीनुसार मारुती कंपनी PLI ने घालून दिलेल्या मापदंडाशी विसंगत असल्याचे कळते.

निवड झालेल्या २० दोन चाकी वाहन उत्पादक कंपन्यांपैकी ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि पियाजियो ह्या प्रमुख मोठ्या कंपन्या आहेत. या सर्व दोन चाकी कंपन्यांना सबसिडी मिळणार असून त्यासाठी त्यांची निवड केली आहे. याच सोबत पिनेकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक कॉमर्स वाहन सिटिंग आणि इंटीरियर कंपनी आहे. तिचा समावेश देखील सबसिडी घेणाऱ्या कंपन्यामध्ये झाला आहे.

केंद्र सरकारने २३ सेप्टेंबर २०२१ साली PLI ही महत्वाकांक्षी योजना आणली होती. ह्या योजनेला २५,९३८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला होता. ह्या योजनेचा मोठा हेतु म्हणजे भारतात इलेक्ट्रोनिक आणि हायड्रोजन इंधनयुक्त गाड्यांच्या उत्पादनावर भर देणे हाच आहे. वरील निवड झालेल्या २० कार उत्पादन कंपन्यांची ‘चैंपियन ओईएम इंसेंटिव स्कीम’ या सबसिडी साठी निवड झाली आहे. तसेच या सर्व कंपन्यांना  कार उत्पादनासाठी १८ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ४५,०१६ कोटी रुपयांची  तरतूद देखील केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!