Share

प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष असणारा तृणमूल काँग्रेस यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर I-PAC आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे. प्रशांत किशोर हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. राजकीय रणनीतीकर असलेले प्रशांत किशोर थेट निवडणूक कधीच लढले नाहीयेत, परंतु त्यांनी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, शरद पवार अश्या देशातील अनेक मोठ्या नेत्यांबरोबर निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षरीत्या काम केले आहे. २०२१ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांची तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्व्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संपूर्ण मदत मिळाली होती. प्रशांत किशोर यांची राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या I-PAC कंपनीने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात मदत केली होती आणि भारतीय जनता पक्षाचे तगडे आवाहन असताना सुद्धा विजयाचा मार्ग सुकर केला होता.

परंतु आता I- PAC आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद वाढत चालला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या मंत्री मंडळात काम करणाऱ्या चंद्रमा भट्टाचार्य यांनी आपल्या अकाउंट वरून ”  “वन मॅन वन पोस्ट” संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत असा आरोप केला आहे. ही पोस्ट शेअर करताना आपली कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप त्यांनी केल्याने I-PAC आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. तृणमूल काँग्रेसने गेल्या वर्षी जूनमध्ये वन मॅन वन पोस्ट उपक्रम सुरू केला होता. मग I-PAC कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा देखील दर्शवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांची बाजू मांडली आणि या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला होता. पण त्यानंतर कोलकाता महापालिका निवडणुकीसाठी फिरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता .अशा परिस्थितीत वन मॅन वन पोस्टच्या दाव्याबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले आहेत.

यावरून आपल्या अकाउंट वरून I-PAC कंपनीने वन मॅन वन पोस्ट अश्या प्रकारची पोस्ट केली होती असा आरोप पश्चिम बंगालच्या मंत्री चंद्रमा भट्टाचार्य यांनी केला आहे. या आरोपावर प्रतिक्रिया देताना I-PAC कंपनी म्हणाली कि, ” I-PAC कंपनी कोणत्याही नेत्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे माननीय मंत्री एकतर खोट बोलत आहेत किंवा त्यांना काय घडलं आहे हे माहिती नाही असे देखील I-PAC म्हणाल आहे. यावरून ममता बॅनर्जी यांचा भाच्चा अभिषेक बॅनर्जी कदाचित तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देऊ शकतो अशी माहिती आता समोर येत आहे .

     महत्वाच्या बातम्या :     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!