Share

IPL Auction 2022: राणाची नाईटरायडर म्हणून कोलकत्यात वापसी

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू: भारतीय फलंदाज नितीश राणाला कोलकाता नाईट रायडर्सने (Nitish Rana will play for Kolkata Knight Riders) पुन्हा संधी दिली आहे. कोलकाताने त्याला ८ कोटींत विकत घेतले आहे. नितीश राणाने आयपीएलमध्ये ७७ सामने खेळले असून त्याने एकूण १,८२० धावा केल्या आहेत. तसेच १३ अर्धशतके झळकावली आहेत.

दरम्यान मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने १७ सामन्यांत १२१.९७ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३८३ धावा केल्या आहेत. तसेच दोन अर्धशतकेही झळकावली होती. तसेच पॅट कमिन्सलाही कोलकाता नाइट रायडर्सने ७.२५ कोटी रुपयांनी विकत घेतले आहे. त्याची पुन्हा एकदा घरवापसी झाली आहे.

दरम्यान आतापर्यंत IPL 2022 च्या लिलावात ट्रेंट बोल्टला राजस्थान रॉयल्स संघाने ८ कोटींत खरेदी केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसला (Faf Duplessis will play for Bangalore)रॉयल चैलेंजर्स बंगलोरने तब्बल ७ कोटींमध्ये खरेदी केले आहे. तर आर अश्विन २ कोटी बेस किंमतीत मेगा ऑक्शनचा भाग बनला होता. मेगा ऑक्शनमध्ये त्याला संघात घेण्यास अनेक संघांमध्ये चढाओढ दिसली. ज्यात राजस्थान रॉयल्सने(rajasthan royals) बाजी मारली आहे. राजस्थान रॉयल्सने फिरकीपटू अश्विनला ५ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!