Share

“गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडची जनता काँग्रेसला लोकसभेत शून्य देत आहे”,नरेंद्र मोदींचा

Published On: 

🕒 1 min read

उत्तराखंड : १४ फेब्रुवारीपासून उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यापूर्वी  (Uttarakhand election 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये ‘विजय संकल्प सभा’ ला संबोधित करताना कॉंग्रेसवर (Narendra Modi criticism of Congress)  निशाणा साधला. गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडची जनता काँग्रेसला लोकसभेत शून्य देत आहे. असा टोला मोदींनी लगावला आहे.

तसेच काँग्रेस पक्षाची एकच ओळख आहे ,सत्ता आली की त्यांचा भ्रष्टाचार बेलगाम होतो आणि सत्ता गेली की त्यांना चीड येते.त्यामुळे पाच वर्षांपासून ते विधानसभेच्या सत्तेबाहेर आहेत. काँग्रेसने उत्तराखंडमधील जनतेला वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित ठेवले. पाण्यासाठी माता-भगिनींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत होते. मात्र आम्ही ‘जल जीवन’ मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे आज उत्तराखंडमधील सुमारे 8 लाख घरांपर्यंत पाईपने पाणी पोहोचत आहे. असे मोदींनी म्हटले आहे.

दुर्दैवाने या राज्याची कमान अनेक वर्षे त्यांच्या हाती गेली, ज्यांनी उत्तराखंडला अस्तित्वात येण्यापासून नेहमीच रोखले होते. जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. दोन्ही ठिकाणी त्यांची सरकारे असताना उत्तराखंडला ब्रेक लावून त्यांनी मागे आणले. असा आरोपही मोदींनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!