🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. देशात काँग्रेस नेत्यांनी कोरोना पसरवला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आता यावरच कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोदींना सडकून टोला लगावला आहे.
“काँग्रेसला दूषणे देण्याशिवाय नरेंद्र मोदी यांच्याकडे आता काही काम राहिलेले नाही. स्वतःच्या कामांची एक ही उपलब्धी त्यांना सांगता येत नाही. चीन- पाकिस्तान च्या वाढत्या कारवाया, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. पण त्यांनी सर्व महत्वाच्या प्रश्नांवर मौन धारण केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, कॉंग्रेस मुक्त भाषण तर करून दाखवा आधी”, असे आव्हानही यशोमती ठाकूर (Yashomati Thakur challenges Modi) यांनी दिले आहे.
दरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनाला महाराष्ट्र शासनाला आणि कॉंग्रेसला जबादार धरल्याने राज्यातून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आज याविरोधातच नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर कॉंग्रेसने आंदोलन छेडले आहे. कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजप आमने-सामने आले आहेत.
काँग्रेस ला दूषणे देण्याशिवाय नरेंद्र मोदी यांच्याकडे आता काही काम राहिलेले नाही. स्वतःच्या कामांची एक ही उपलब्धी त्यांना सांगता येत नाही. चीन- पाकिस्तान च्या वाढत्या कारवाया, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. पण त्यांनी सर्व महत्वाच्या प्रश्नांवर मौन धारण केले आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 10, 2022
कॉंग्रेस कार्यकर्ते विकास ठाकरे यांनी नागपूरचे खासदार म्हणून नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी नरेंद्र मोदींना(Prime Minister Narendra Modi) महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागण्याची विनंती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा अभिमान ठेवायला हवा. असेही ते म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपही याठिकाणी आंदोलन करत आहे. कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते याठिकाणी जमले भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
- गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
- IPL 2022: माहीची झलकच वेगळी! मेगा ऑक्शनआधी केलेली ऍक्शन पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात…!
- जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
