🕒 1 min read
नवी-दिल्ली : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे धाकटे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर(Hridaynath Mangeshkar) यांना वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा दावा केला. दरम्यान, मोदींच्या या दाव्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,‘संसदेमध्ये वीर सावरकरांचे गाणे गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमावली असे सांगण्यात आले. मला कळायला लागल्यापासून मी त्यांचे ‘सागरा प्राण तळमळला’ गाणे आकाशवाणीवरुनच ऐकले आहे. तस बघायला गेलं तर हे गाणं लोकप्रिय करण्याचे काम आकाशवाणीनेच केले आहे. त्यामुळे घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. आमची सावकरांची भक्ती आहे. आमची नौटकं नाही.’ तसेच जर एखादं गाणं गायल्याबद्दल संगीतकाराला काढले असेल तर ते गाणं आकाशवाणीवर लावतील का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार?’; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल
-
“राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा..”, केशव उपाध्येंचा टोला
-
“…हेच का तुमचं महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र बाणा”, राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावले
-
VIDEO: “पळत का नाहीस रे” कर्णधार रोहितने खेळाडूला मैदानावर झापले
-
UP Assembly Election 2022 : “देशाला भयापासून मुक्त करा”, राहुल गांधींचे ट्वीट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
