Share

VIDEO: “पळत का नाहीस रे” कर्णधार रोहितने खेळाडूला मैदानावर झापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा सामना जिंकला आहे. तसेच दुसरा सामना जिंकत मालिका  २-० ने जिंकली आहे. भारतने चांगली फलंदाजी करत सामना जिंकला मात्र रोहितच्या कर्णधारपदाची आणखी एक बाजू यावेळी बाहेर आली जी सहसा पाहायला मिळत नाही. वेस्ट इंडिजला गोलंदाजी करताना रोहित युझवेंद्र चहलवर भडकताना दिसला आहे.

वेस्ट इंडिजला गोलंदाजी करताना ४५ व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदर ओव्हर सुरु करणार त्याच आधी कर्णधार रोहित शर्माने युझीला बोलवले आणि म्हणाला “एक काम कर, पिछे जा… क्या हुआ तेरेको भाग क्यू नहीं रहा ठीक से?” (एक काम कर मागे जा… काय झालं तुला, नीट पळत का नाहीयेस?)” रोहित शर्मचा युझीला झापतानाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/imshantanu105/status/1491440118686961666?s=20&t=DudHB2TDMrRUylPgfCDzYA

रोहित शर्मा सहसा असा मैदानावर नाराजी दर्शविताना दिसत नाही. संघाचे नेतृत्व करताना तो धोनी सारखाच कुल असतो. मात्र जिंकायला अवघ्या काही विकेट्स बाकी असताना त्याने चहलला असे फाटकारने चाहत्यांसाठीही थोडे आश्चर्यकारक होते. सामना जिंकल्यानंतर मात्र रोहितने विजयावर आनंद व्यक्त केला आहे. रोहित साठी पूर्णवेळ कर्णधार म्हणून हा पहिला मालिका विजय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!