🕒 1 min read
नवी दिल्ली : आज(१० फेब्रु.) दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याची टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवले असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,‘कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल त्यांनी काढावी. महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर? ज्या राज्याने जगात सर्वोत्त काम केले. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रात प्रेतं बेवारसपणे फेकली नाही . किती खोटं बोलता आपण. एका तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्याने निषेध तर नाहीच पण निदान नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्र प्रेम, हा तुमचा महाराष्ट्र बाणा.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांना देशाचा युगपुरुष मानला जातो. हे फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण बाणा आमच्याकडे आहे’, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
-
अमरावती शाईफेक प्रकरण; आयुक्त प्रवीण आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया
-
“जर मी भारतात जन्मलो असतो तर…”; एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
-
“मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, कॉंग्रेसचा इशारा
-
शिवसेना आणि महाराष्ट्र येड्यागबाळ्यांसमोर झुकणारा नाही- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
