Share

मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र प्रशासनाने रात्रीतून पुतळा काढल्याने वाद निर्माण झाला होता. आता तो वाद अजूनच चिघळला आहे. काल (९ फेब्रुवारी) काही महिलांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. (Ink thrown on Municipal Commissioner Praveen Ashtikar) याप्रकरणी आमदार रवी राणांसह (MLA Ravi Rana) दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रवी राणासह अजय बोबडे, विनोद येवतीकर, सुरज मिश्रा, संदीप गुलहाने, महेश मूलचंदानी, अजय मोरया, कमलकिशोर मालानी, प्रीती देशपांडे, साक्षी उमक आणि मीरा कोलटेके यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक करणाऱ्या महिला खासदार नवनीत राणांच्या (MP Navneet Rana) कार्यकर्त्या असल्याचे म्हटले जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. पोलिसांनी सावरासावर केली मात्र, त्या महिलांना तेथून पळ काढण्यात यश मिळाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!