🕒 1 min read
मुंबई: मुंबईतील मोठ्या खेळ उद्यानापैकी शिवाजी पार्क (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) हे एक मैदान आहे. या ठिकाणी व्यायामशाळा, टेनिस कोर्ट, क्रिकेट कोर्ट आदी मैदाने आणि वास्तु स्थित आहेत. शिवाजी पार्क हे मध्य मुंबईत येत असल्याने सर्वांना सोयीस्कर आणि जवळचे मैदान आहे. शिवाजी पार्कवर इतर राजकीय सभा आणि कार्यक्रम देखील घेतले जातात. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तेथेच अंत्य संस्कार देखील झाले होते.
काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्य संस्कार पार पडले. काही नेत्यांकडून तेथे लता मंगेशकर यांचे स्मारक बांधले जावे अशी मागणी होत आहे. मात्र काही नेते तेथे खेळाचे मैदान असून स्मारक बांधण्यास ती भूमी योग्य नाही असे मत देत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे समाधी स्थळ देखील शिवाजी पार्क मैदानाला लागून आहे.
शिवाजी पार्क वर अंत्य संस्कार करणे योग्य आहे परंतु तेथे स्मारक उभारणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. शिवाजी पार्कचा मसनवटा करू नका अश्या शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा प्रश्न असताना ते आता राज्य आणि केंद्र सरकार कुठे उभारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आणि शिवाजी पार्क विषयी प्रशासन या पूढील काळात काय निर्णय घेणार, हे पहाणे महत्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
- अभाविपचे ‘विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन’
- Amaravati : शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला म्हणून महापालिका आयुक्तांवर शाई फेक
- ‘केंद्रातलंही सरकार आम्ही ताब्यात घेऊ’; नवाब मलिकांचा इशारा
- शरद पवार, दानवे, कोल्हे या नेत्यांची दिल्लीत भेट; चर्चेला उधाण
- राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
