Share

“सुपरमार्केट मध्ये वाईन विकण्याचा निर्णय…”; शरद पवारांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्रामधील मोठ्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली. या सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. विरोधी बाकांवर असलेल्या भाजपने सुद्धा सत्ताधारी महाविकासआघाडीला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र राज्य आता  मद्यराष्ट्र करायचे आहे का ? असा प्रश्न भाजप आणि सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी, “सुपरमार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय बदलल्यास हरकत नाही आणि असे केल्यास वाईटही  वाटणार नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास मागच्या महिन्यात परवानगी दिली होती. या निर्णयामुळे राज्यभरात सत्ताधारी महाविकास आघाडीवर चौफेर टीका झाली होती. या विषयावर पुण्यातील गोविंदबाग या निवास्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, “सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय बदलल्यास हरकत नाही आणि असे केल्यास वाईटही  वाटणार नाही” असे सूचक वक्तव्य केले. हे वक्तव्य करतानाच वाईन आणि दरात जे काही आहे त्यात नक्की काय फरक आहे हे देखील जाणून घेतले पाहिजे अशीही भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

“भारतातील इतर प्रगत राज्यात मोठ मोठ्या दुकानात अजूनही देशी आणि विदेशी दारू उपलब्ध करून देण्यात येते. परंतु यात वाईनच प्रमाण अत्यल्प आहे. भारतात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. याच द्राक्षांपासून पुढे वाईन बनवण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थातच याचा फायदा होतो, परंतु या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यास योग्य वेळी सुपरमार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास काहीच हरकत नाही आणि त्याचे वाईटही वाटणार नाही,” असे वक्तव्य आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!