Share

शिवसेनेने वनगा कुटुंबियांच्या दुःखाचे राजकारण केले – फडणवीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा /प्रशांत झावरे : चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूनंतर पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक शिवसेनेसह भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून बोईसर मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या वेळी भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पालघर जिल्ह्यातील गुजराती व उत्तर भारतीय मतदाराला आकर्षित करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेनं वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे राजकारण केले. दुःख सावरण्यासाठी असते, त्याच राजकारण करायला नको होते. दुःख सावरण्यासाठी मदत करणे गरजेचे होते, परंतु ते जनतेसमोर मांडून राजकारणासाठी त्याचा उपयोग करणे म्हणजे लाजिरवाणी बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेनं दिवंगत वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे राजकीय भांडवल केले असून हा संधीसाधूपणा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, या सर्व लाजिरवाण्या प्रकारामुळे जनता तुम्हाला माफ करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नसून त्यावेळची शिवसेना छातीवर वार करत होती, त्यांच्या काळात पाठीवर कधीच वार केला गेला नाही, विश्वासघातकीपणा बाळासाहेबांनी कधीच केला नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर प्रखर टीका करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस भगवा झेंडा हाती घेतला त्यावेळेस तो दुर्जनांच्या विरोधात घेतला होता, खंडणीखोरी करण्यास घेतला नव्हता असे बोलून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला . तसेच भगवा झेंडा हाती घेऊन खंडणीखोरी करणाऱ्यांनी आम्हाला भगव रक्त सांगू नये, आमचं पण रक्त भगव असून आमची जातकुळच भगवी आहे असे म्हणत शिवसेनेच्या मुळावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाव घातला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!