मुंबई : विराट कोहलीने उरलेल्या कसोटी कर्णधारपदाचा हि राजीनामा दिल्यानंतर त्याला सगळीकडून सल्ले मिळत आहेत. नेतृत्व सोडल्यानंतर त्याने फलंदाजीवर लक्ष द्यावे असे काहींचे म्हणणे होते. मात्र कर्णधार असताना त्याचे माजी सहकारी असणारे कोच रवी शास्त्रींनी त्याला हटके सल्ला दिला आहे.
लेजंड लीगसाठी रवी शास्त्री ओमानमध्ये आहे. तिथे शोएब अख्तर हि आहे. शोएबसोबत मुलखतीत बोलताना रवी शास्त्री म्हणाले ” विराटने कर्णधारपद सोडणे माझ्यासाठी धक्कादायक होते. त्याने नक्कीच दोन वर्ष कॅप्टन्सी केली असती एक मालिका हरले म्हणजे काय झाले. ” सोबतच त्यांनी विराटला एक हटके सल्ला हि यावेळी दिला ” मला वाटते त्याने दोन तीन महिने ब्रेक घेऊन कुठे तरी फिरायला जावे , जेणेकरून तो माइंड फ्रेश करून पुन्हा एकदा त्याचा खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल. कारण तो जसा खेळाडू आहे तो क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार आहे.”
शोएबच्या युट्युबसाठी त्यांनी हि मुलाखत दिली आहे. यावेळी केवळ विराट नाही तर त्यांनी रोहित आणि धोनीचेही तोंड भरून कौतुक केले. माहीबद्द्दल बोलताना ते म्हणाले “तो खूप संतुलित आहे. मी त्याचा सारखा माणूस कुठेही पाहिला नाही. त्याचाकडे फोनही नसतो. अजून माझ्याकडे त्याचा नंबरही नाही , पण मला माहितीये त्याला सापडायचे असेल तर फोनची गरज नाही.” रवी शास्त्रींनी दिलेल्या सल्ल्याचा फायदा विराटला होऊ शकतो. मात्र सध्या विराटचे संपूर्ण लक्ष वेस्ट इंडीज विरुद्ध मालिकेकडे लागले आहे. तर त्याचे चाहते त्याच्या ७१व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “…तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का?”, यूपीतील आंदोलनावरून जितेंद्र आव्हाडांचा योगी सरकारवर निशाणा
- जान्हवी ‘मिस्टर आणि मिसेस माही’ चित्रपटाच्या शुटींगसाठी सज्ज,पहिला फोटो केला शेअर
- “ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
- “ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतानचं नाव दिलं, त्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?”
- रोहितच्या कर्णधारपदाचे नवे पर्व सुरू!; वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा

