Share

क्रांती चौक ते गोपाल टी रस्त्याचे कायापालट होणार; आमदार संजय शिरसाट यांचा ग्रीन सिग्नल!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या क्रांती चौक ते गोपाल टी रस्त्याचे कायापालट करण्याच्या योजनेला आमदार संजय शिरसाट(MLA Sanjay Shitsath) यांनी मान्यता दिली आहे. आमदारांनी सुचविलेल्या बदलानंतरची रचना लवकरच कार्यान्वित केली जाईल. आमदार संजय शिरसाट यांनी ट्रॅफिक, पार्किंग या गोष्टींचा विचार करून काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार बदल करून प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा स्ट्रीट्स फॉर पीपलचा एक भाग म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय मार्गदर्शनाखाली शहरातील चार रस्त्यांचा कायापलट करीत आहे. याच्यात पैठणगेट ते गुलमंडी, कॅनॉट परिसर, प्रियदर्शनी एमजीएम रस्ता आणि क्रांती चौक ते गोपाल टी या रस्त्यांचा समावेश आहे. त्याच्यासाठी सोमवारी आयुक्तांच्या दालनात औरंगाबाद स्मार्ट सिटीने आमदार संजय शिरसाट ह्यांना क्रांती चौक ते गोपाल टी ह्या रस्त्याच्या परिवर्तनाचे डिझाईनचे सादरीकरण केले.

या वेळेस शहर अभियंता सखाराम पानझडे, औरंगाबाद स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी सादरीकरण केले. शिरसाट यांनी या डिझाईन बघितल्या नंतर प्रकल्पाचे कौतुक केेले व सांगितले की डिझाईन राबवताना ट्रॅफिक, पार्किंग आणि पादचाऱ्यांना लक्षात घ्यावे. त्यांना दिलेल्या सूचनेनुसार डिझाईनमध्ये बदल करण्यात येईल. आणि सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन रस्ते परिवर्तन करण्यात येईल, असे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!