Share

सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) आणि प्रज्ञा जयस्वाल (pragya jaiswal) या दोघांचा ‘मैं चला’ म्युझिक व्हिडिओ (music video) नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या गाण्याला सलमानची मैत्रीण युलिया वंतूर (Iulia Vantur) यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

दरम्यान गायक गुरु रंधावा (guru randhawa) आणि सलमानची मैत्रीण युलिया वंतूर (Iulia Vantur) यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. या गाण्यावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर या गाण्याची प्रचंड चर्चा होत आहे.

दरवेळी वेगळी स्टाईने प्रसिध्द असलेल्या सलमानने या गाण्यात चक्क शीख लूक दिसत आहे. तसेच त्याने खास पगडी बांधली असून प्रज्ञा साडीत दिसत आहे. या गाण्यातला त्याचा लुक त्याच्या (Antrim The Final Truth) या चित्रपटाची नक्कीच आठवण करून देतो.

अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालचा लुक देखील थोडाफार दबंगमधील सोनाक्षी सिन्हासारखाच दिसत आहे. गाण्याचं शुटिंग हिरवळ आणि नदीजवळ करण्यात आलं असून ही जोडी देशी रोमान्समध्ये खास दिसत आहे. लोकप्रिय गायक गुरू आणि युलिया वंतूरने गायलेलं ‘मैं चला’ हे गाणं युट्यूबवर नुकतचं रिलीज करण्यात आलं असून गाण रिलीज झाल्यानंतर भरपूर लाईक कमेंट येत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!