🕒 1 min read
जालना: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली. पण निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने (BJP) हा मुद्दा चांगलाच तापवला असून आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली.
नाना पटोले यांनी केलेल्या त्या व्यक्तव्यानंतर पटोले यांना भाजपकडून धमक्या येत आहेत. नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं होतं. त्यामुळे अनिल बोंडे यांच्या विरोधात तक्रार कॉंग्रेसने दाखल केली आहे.
आता याच पार्श्वभूमीवर जालना येथील भाजप नेते तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जोगस (Sujit Jogas) यांनी देखील नाना पटोले यांना धमकी दिली आहे. ‘नाना पटोलेंची जीभ छाटा एक लाख मिळवा’ अशी घोषणाच सुजित जोगस यांनी केली आहे. जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे. त्यामुळे काँग्रेसही आता आक्रमक झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘फडणवीसांना काही बरे-वाईट झाले तर…’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांवर निशाणा
-
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; जितेंद्र आव्हाड म्हणतात…
-
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; विशेष न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
-
धनुष-ऐश्वर्या विभक्त होताच राम गोपाल वर्माचे अजब वक्तव्य म्हणे, ‘घटस्फोट सेलिब्रेट करा’
-
महाभारत फेम नितीश भारद्वाज पत्नीपासून विभक्त, भावनिक खुलासा करत म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
