🕒 1 min read
बीड : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या उस्मानाबाद-बीड-लातूर या जागेसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शंभर ते दीडशे मतांच्या अंतराने निवडून येऊ, असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांमध्ये भाजपला चांगलं मतदान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान पद्धतीचं उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या हातात घड्याळ घातले, काहींना किचन दिलं, तर काहींच्या शर्टवर चिप्स लावले, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
