Share

‘…म्हणून माझ्या विरोधात कारवाया’; प्रताप सरनाईक यांचे वक्तव्यं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांचे ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे सरनाईक यांना पाठवलेली ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार आहे. या निर्णयामुळे भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

या निर्णयानंतर पहिल्यांदाच प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले, व्ही. एन डेव्हलपर्सने (V.N. Developers) महापालिकेची शाळा विकसित करुन दिली. नंदकुमार जंत्रेंची बदली झाली आणि त्यानंतर पालिकेत आर. ए. राजीव नावाचे आयुक्त आले. त्यांनी आल्यानंतर शिवसेनेच्या विरोधातील भूमिका घेतली, असा आरोप यावेळी प्रताप सरनाईक यांनी केला.

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, शिवसेनेचे मागासवर्गीय असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन नगरसेवकांचं पद रद्द करण्याची नोटीस त्यांनी काढली. त्यावेळी सर्वात प्रथम प्रताप सरनाईकने त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. आमदार नात्याने मी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठीशी उभा राहिलो म्हणून माझ्या विरोधात आर. ए. राजीव यांनी कारवाया करायला सुरुवात केली, असा आरोप यावेळी सरनाईक यांनी लावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!