Share

औरंगाबादेत मेट्रो ही शिवसेनेचीच मागणी; माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा दावा..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडर, ऐतिहासिक पर्यटनकेंद्र असल्याने शहरात मेट्रो रेल्वे गरज आवश्यक होती. त्यामुळे ७ फेब्रुवारी २०१८ रोजी आपण ही मागणी लोकसभेत केली होती. त्यामुळे ही शिवसेनेची मागणी असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शहरात महामेट्रो होत असल्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. त्यामुळे महामेट्रोवरुन पुन्हा एकदा राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (महा मेट्रो) नेमले आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी, महामेट्रो आणि नॅशनल हायवे अॉथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI)अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय परिवहन मंत्र्यांना जालना रोडवरील फ्लायओव्हरसाठी पत्र लिहिले होते.

खैरे यांनी म्हटले आहे, औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी, बिबि का मकबरा, पाणचक्की आदी पर्यटन स्थळे आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी, शनिशिंगणापूर आदींसह प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथून जात असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी, मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडर, पर्यटन केंद्र येथे जाण्यायेण्यासाठी दळणवळण व्यवस्था मुबलक राहण्यासाठी मेट्रो रेल आवश्यक असल्याचे शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत सांगितले होते. तत्कालीन रेल्वे खात्याने याबाबत सर्वेक्षण करणार करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याच आधारे ही माहिती सादर झाल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!