Share

“पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही,” संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले होते, ‘ज्योतिष, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला होता.

संजय राऊत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले, ‘पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही,’ असो टोलाही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!