🕒 1 min read
मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावर बॉलीवूडचा ‘टार्जन’ (‘Tarzan’) अभिनेता हेमंत बिरजे (Hemant Birje) यांचा भीषण अपघात (accident) झाला आहे. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही गाडीत होती. अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. पुण्याच्या रस्त्यावरून येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बिरजे यांचा हा अपघात कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. ऊर्से टोलनाक्याजवळ रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. मंगळवारी सायंकाळी बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी हे पुण्याला निघणार होते. पण तत्पूर्वी हेमंत बिर्जे यांनी सर्दीवरच्या दोन गोळ्या खाल्ल्या आणि मग चारचाकी गाडीचे स्टेरिंग हाती घेतलं. मुंबईतील प्रवास पूर्ण करून ते द्रुतगती मार्गाला लागले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune expressway) बोरघाट, खंडाळा आणि लोणावळा ही त्यांनी मागे टाकला. पण उर्से टोल नाक्या जवळ बिर्जे यांच्या डोळ्यावर झापड आली. सर्दीच्या गोळ्यांमुळं त्यांना झोप येऊ लागली. बिर्जे यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात स्वतः हेमंत बिर्जे आणि त्यांचे कुटुंब जखमी झाले आहे. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे” हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. “सर्दी झाली म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना डुलकी लागली आणि गाडी दुभाजकाला धडकली,” असं हेमंत बिरजे यांनी सांगितलं आहे.
अभिनेता हेमंत बिर्जे यांनी बॉलिवूडमधील १९८५ मध्ये आलेल्या ‘अडवेंचर्स ऑफ ”टार्जन” (‘Tarzan’film) या चित्रपटात टार्जनची भूमिका साकारली होती. याच चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीझोतात आले होते. त्यानंतर हेमंत बिर्जे यांची बॉलिवूडचा ”टार्जन” अशी ओळख निर्माण झाली. सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत. ”टार्जन”चं नंतर ते टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा रंगली होती. आजही बॉलिवूडचा टार्जन म्हणून त्यांची ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला खोचक टोला
- शरद पवार पंतप्रधान होणार?, नवाब मलिकांनी दिले स्पष्टीकरण
- फडणवीस घरी गेले अन् मायकल लोबोंनी भाजपला सोडचिठ्ठी देत पत्नीसह काँग्रेस प्रवेश केला
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्हपुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
