Share

“…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘रयत शिक्षण संस्थेमध्ये एकाच कुटुंबातील नऊ सभासद झाले आहेत. या संस्थेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी या शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद सोडावं,’ अशी टीका सातारा जिल्ह्यातील शिवसेना आमदार महेश शिंदे (Shiv Sena MLA Mahesh Shinde) यांनी केली होती. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

…पण तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढा तपासून पाहा

“वैयक्तिक टीकेमुळेअशा लोकांना टीव्हीवर, वृत्तपत्रांत चमकायला मिळते. महेश शिंदे यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. मात्र या संस्थेत शिक्षकांना पगार नाही. विद्यार्थी कुठे आहेत, याचा पत्ता नाही. त्यांनी मदन जगताप सोबत ५० टक्के पार्टनरशीपमध्ये ही संस्था उघडली. मात्र तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्यचे काय झाले? शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते. तुम्ही शरद पवारांपेक्षा उंचीने २ इंच कमी आहात, असं तुम्ही म्हटलं आहे. मात्र शरद पवार हे त्यांच्या उंचीमुळे नाही तर कर्तुत्वामुळे ओळखले जातात.रयत शिक्षण संस्थेचा बहुजन समाजासाठी जो उद्देश होता त्याच पद्धतीने या संस्थेची पाळंमुळं खेडोपाड्यात पसरली. त्यामागे फक्त पवार साहेब होते. त्यामुळे ज्या माणसासमोर आपण बोलत आहोत, त्यासमोर आपले कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा…बोलायला तुम्हाला कोण अडवत आहे. पण स्वतःची लाज स्वतः च्या हाताने घालवू नका.तुम्ही उंचीने किती आहात, याबद्दल माझा प्रश्न नाही. पण तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढा तपासून पाहा.” असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लगावला आहे.

शरद पवार यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेवर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर महेश शिंदे काय बोलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!