🕒 1 min read
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहे. यापैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी ८० टक्के जनता आपल्यासोबत असल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
“मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
योगींचे ‘ते’ वक्तव्य-
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, जे राम मंदिरला विरोध करत आहेत त्यांचा सामना ८० टक्के लोकांसोबत आहे. त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यवरून राजकारण पेटले आहे. योगी आदित्यनाथ त्यातून थेट मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप आता इतर पक्षातील नेत्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी पक्ष उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार; शरद पवारांचे मोठे विधान
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
