🕒 1 min read
नवी-दिल्ली : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकांना सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. याला अनुसरून आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह(Digvijay Singh) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिग्विजय सिंह म्हणाले की,’आरएसएस हे एखाद्या वाळवीप्रमाणे असून जशी वाळवी हळूहळू संपूर्ण घर किंवा घरातील वस्तू उद्ध्वस्त करते, तशाच प्रकारे आरएसएस देखील हळूहळू आणि सावधपणे संपूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहे’, असे सिंह म्हणाले. तसेच सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मला माहिती आहे की आरएसएस आणि वाळवीची तुलना केल्यामुळे माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येणार आहे. परंतु मी आरएसएसला नाही तर संपूर्ण व्यवस्थेला हळूहळू उद्ध्वस्त करणाऱ्या आरएसएसच्या विचारसरणीला वाळवी म्हणालो आहे’, असेही सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
