Share

अभिनेता जितेंद्र जोशी कोरोनाच्या विळख्यात ; म्हणाला, ” कोरोनाने मला निवडले..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. देशातील बड्या नेत्यांपासून अनेक कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता जितेंद्र जोशी (Actor Jitendra Joshi) यास देखील कोरोनाची लागण (Corona)  झाली आहे. याबद्दल सोशल मीडियावर त्याने एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपले मित्र आणि चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. नुकतच अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्या पोस्ट लिहलं आहे की,” कोरोना ने मला निवडले, अत्यंत त्रासदायक आणि ”ताप” दायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी सर्व लक्षणे!” तसेच पुढे म्हणाला, माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन ही केले आहे.

https://www.instagram.com/p/CYlHwWtF32q/?utm_source=ig_web_copy_link

तसेच आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR) आल्यानंतर नेमका कुठला कोरोना आहे हे सांगत, वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं ही जोशीने स्पष्ट केले आहे. या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी काळजी घ्या असा सल्ला देत आहेत. अभिनेत्याने आजवर मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दमदार भूमिका वठविल्या आहेत.

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. ”दुनियादारी”मधील साई असो की, ”तुकाराम” चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहज अभिनयाने वठविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!