🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. देशातील बड्या नेत्यांपासून अनेक कलाकारांना संसर्ग झाला आहे. आता प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Famous singer Lata Mangeshkar) यांना ही कोरोनाची लागण (covid-19 positive) झाल्याची बातमी समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये ICU असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. लता मंगेशकर यांची भाची रचना हिला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. ही माहिती एका ट्विटद्वारे सोशल मीडियावर प्रसिध्द झाली आहे.
"She is doing fine; has been kept in ICU only for precautionary reasons considering her age. Please respect our privacy and keep Didi in your prayers," singer Lata Mangeshkar's niece Rachna to ANI
— ANI (@ANI) January 11, 2022
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. त्या तब्बल 92 वर्षांच्या असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांच्या मोठ्या लेक आहेत. लता मंगेशकर यांना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचंय”
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
