🕒 1 min read
गोवा: प्रमोद सावंत यांच्या सरकारला गोव्यात मोठा धक्का बसला आहे. आमदार तथा मंत्री मायकेल लोबो (Michael Lobo) यांनी भाजप पक्षातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
“मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. गोवा भाजपमध्ये मला मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही, ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना भाजपने बाजूला केले आहे.” अशी प्रतिक्रिया मायकेल लोबो यांनी दिली आहे.
“मी गोव्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कळंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. मी आमदारकीचा राजीनामा देईन, पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. मी इतर राजकीय पक्षांशी चर्चा करत आहे. आमच्याकडे ज्या पद्धतीने पाहिले जाते त्यामुळे मी नाराज होतो आणि पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत.” असेही त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यामुळे हा भाजप पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘…या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते’, आयआयटी प्राध्यापकाचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
