🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री ११ ते सकाळी ५ हा नाईट कर्फ्यू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. ९ जानेवारी मध्यरात्रीपासून हे नियम लागू होतील. तसेच ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात होते, त्यानंतर ठाकरे सरकारने सुधारीत आदेश काढत ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर जीम आणि ब्युटी पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
आधी मोठ्या ऐटीत अत्यंत विचारपूर्वक जिम आणि ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
मग जादूची कांडी फिरली आणि नेहमीप्रमाणे सखोल विचार करून ठाकरे सरकारने U टर्न घेतला.
आता ५०% क्षमतेने जिम आणि ब्युटी पार्लर सुरू राहणार. pic.twitter.com/D63eDuRTzb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 10, 2022
भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘आधी मोठ्या ऐटीत अत्यंत विचारपूर्वक जिम आणि ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मग जादूची कांडी फिरली आणि नेहमीप्रमाणे सखोल विचार करून ठाकरे सरकारने यू टर्न घेतला. आता ५० % क्षमतेने जिम आणि ब्युटी पार्लर सुरू राहणार.’ अशी टीका भातखळकरांनी केला आहे.
सुधारित आदेशात राज्य सरकारने म्हंटले आहे की, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. तसेच ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. जिम देखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच जिममध्ये प्रवेश असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
