Share

“…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच यावेळी राऊतांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’पाच राज्यांतील निवडणुका कोविडच्या विळख्यात सापडल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे निवडणूक आयोगाने मान्य केले. त्यामुळे सभा, पदयात्रांवर १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांनी समाजमाध्यमांवर ऑनलाइन प्रचार करावा, असे निवडणूक आयोगाने सुचवले आहे. भारतीय जनता पक्ष याबाबतीत सगळ्यात पुढे व जोरात असतो. समाजमाध्यमांवरील प्रचारासाठी त्यांच्या सायबर फौजा तत्पर असतात व हा पक्ष त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असतो. भाजपच्या मैदानी प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद सध्या थंडावला आहे. पंतप्रधान मोदी हे फिरोजपूरला प्रचारासाठी निघाले व मध्येच अडकले, पण प्रत्यक्ष प्रचार सभेच्या ठिकाणी लोक फिरकलेच नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल. इतर राजकीय पक्षांचे ‘आयटी’ सेल भाजपच्या तुलनेत तोकडे असले तरी प्रभावी आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीचे लोक समाजमाध्यमांवर घोडदौड करताना दिसतात, पण वृत्तवाहिन्या व डिजिटल माध्यमांवर सरकार म्हणून भाजपचा दबाव आहेच व त्याचे प्रतिबिंब त्या छोटय़ा पडद्यांवर दिसत असते.’

पंजाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) दौऱ्यांचा सुरक्षेच्या कारणास्तव फियास्को झाला. त्या गोंधळातही राजकारण होतेच, पण इतरही अनेक पंगोरे होते. किती वृत्तवाहिन्यांनी निर्भीडपणे, निःपक्षपातीपणे या प्रकरणाची दुसरी बाजू दाखवली? प. बंगालातील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना जखमी करण्याचा प्रयत्न झाला. तोसुद्धा त्यांच्यावरील हल्ल्याचाच प्रयत्न होता असे तृणमूल काँग्रेसच्या लोकांना वाटत होते. प. बंगालची सुरक्षा व्यवस्था तेव्हा पेंद्रीय सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली होती हे लक्षात घेतले तर पंजाबातील मोदींच्या बाबतीत घडलेला प्रकार व बंगालातील ममतांवरील हल्ल्यात साम्य स्थळे आहेत. या सर्व प्रकाराकडे तटस्थपणे पाहणे गरजेचे आहे.

दरम्यान, निवडणूक काळात असे प्रकार पुन्हा घडतील किंवा घडवले जातील तेव्हा निवडणूक आयोगाच्या निःपक्षपणाची कसोटी लागेल. तरीही सगळ्यात मोठे आव्हान आहे ते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचेच. निवडणूक आयोग म्हणतेय, सर्व मतदान कर्मचारी लसवंत असतील. दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना एक ‘बुस्टर डोस’ दिला जाईल. सर्व मतदान पेंद्रे निर्जंतुक केली जातील. मतदान पेंद्रांवर मास्क, सॅनिटायझर ठेवले जातील. हे सर्व ठीक आहे, पण आता संसदेतच चारशेहून जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले आहे. सीबीआय मुख्यालयात शंभर कोरोनाबाधित झाले. पोलीस, सुरक्षा दलात कोरोना संक्रमण वाढले आहे. या सगळ्यांपासून निवडणूक कर्मचारी सुरक्षित राहोत व निवडणुका व्यवस्थित पार पडोत हीच अपेक्षा, असेही राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!