Share

किरीट सोमय्यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे उत्तर; म्हणाले,‘सोमय्यांनी बोलताना भान…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का?या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना १० दिवसांमध्ये ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा देत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेवर आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी उत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,’सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’काही सत्ताधारी नेते स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट,लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!