Share

‘मोनलूपिरावीर या औषधाचा वापर टाळा, अन्यथा…’, डॉ. कपिल झिरपे यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच मोनलूपिरावीर या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतानाचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्कफोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे(Dr.Kapil Zirpe) यांनी मोनलूपिरावीर या औषधाचा वापर टाळा, असे म्हंटले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना डॉ.झिरपे म्हणाले आहेत की,’मोनलूपिरावीर या औषधांचा डॉक्टरांनी सर्रास वापर करू नये. हे औषध अँटी व्हायरल असून कोरोनाच्या विषाणूला रिप्लिकेट करते.’ तसेच ओमिक्रॉनचा संसर्ग खूप वेगाने पसरत असून दोन दिवसात तो दुप्पट होत आहे. मुंबई-पुण्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत होत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’तिसऱ्या लाटेला अनुसरून महाराष्ट्र टास्क फोर्सने वेगवगेळ्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार व टास्क फोर्सने याची दखल घेतली आहे. परंतु असे असले तरी लोकांनी या लाटेला घाबरून न जाता धीराने सामोरे जायचे आहे लक्षात ठेवले पहिजे’, असेही डॉ.झिरपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!