Share

‘महादेवाची कृपा होती म्हणून, नाहीतर मोदींची हत्या…’; केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्यं

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंजाबच्या (Panjab) फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या निष्काळजीपणाबद्दल केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रकरणावरून भाजपने कॉंग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला आता नवीन विषय मिळाला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) सविस्तर अहवाल मागितला होता. त्यावर पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवालयाकडे लिखित रिपोर्ट सादर केला असून याप्रकरणी स्थापन केलेली समिती पुढील तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याची माहिती दिली आहे.

या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटीवरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही होऊ शकली असती, पंतप्रधानांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा काही योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्याही वर त्याचे धागेदोरे सापडू शकतात. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!