🕒 1 min read
उन्नाव : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर उन्नावचे भाजप आमदार पंकज गुप्ता(Punkaj Gupta) यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. तसेच आमदाराला व्यासपीठावर मारल्यानंतर पोलीस त्या वृद्धाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी(७ जाने.)पंकज गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असतांना गुप्ता यांनी सांगितले की,’व्हिडीओ फुटेजमधला माणूस हे माझे काका आहे आणि त्यांनी मला प्रेमाने गालावर मारले.’ तसेच विरोधी पक्षनेत्यांनी राजकीय फायदा मिळवण्यासाठी या प्रकरणाला वेगळा रंग दिला असून राज्यातील आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते अशा प्रकारची नौटंकी करत आहेत, असेही गुप्ता म्हणाले.
Uttar Pradesh- Farmer leader slapped BJP MLA from Unnao Sadar Pankaj Gupta. This real securitybreach ????????. Pura desh ka same mood hai. @PMOIndia @BJP4India @yogi @brinderdhillon @LambaAlka @CHARANJITCHANNI #70000Kursi700Bande pic.twitter.com/bZONyCdkpR
— Manjot Singh (@ManjotPB) January 7, 2022
दरम्यान, या पत्रकार परिषदेत ज्या वृद्धाने गुप्ता यांच्या कानशिलात लगावली होती ते देखील उपस्थित होते. त्यांचे नाव छत्रपाल असून यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’मला आमदारांपासून कोणतीही अडचण नाही. ते स्टेजवर निवांतपणे बसले होते, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्याने त्यांना प्रेमाने थोपटले.’
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
