🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत काही त्रुटी आढळून आल्या. अचानक रस्ता मार्गाने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि रस्त्यावर आंदोलक आंदोलन करत असल्याने त्यांचा ताफा एका फ्लायओव्हरवर अडकून पडला. या प्रकरणावरून भाजप आणि कॉंग्रेसयामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण देखील चांगलेच तापत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवरुन आता पंजाब सरकारला केंद्र सरकार धारेवर धरत आहे. मात्र यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CM Charanjeet Singh Channi) यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. आता या प्रकरणावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका होता का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी देखील वक्तव्यं केलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार (Ravish Kumar) त्यांच्या कार्यक्रमात बोलत असताना एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कुठल्या पूर्वसूचनेशिवाय अचानकपणे लाहोर विमानतळावर उतरले तर जीवाला काही धोका नाही पण अचानक शेतकऱ्यांसमोर अडकले तर मात्र जीवाला धोका कसं काय निर्माण झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता या प्रकरणी खरंच सुरक्षेत त्रुटी होत्या की हे कॉंग्रेस नेते म्हणतात तसं हे केवळ एक ढोंग होतं, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मोदींचे ढोंग जनतेसमोर आले’, सचिन सावंत यांचा टोला
- अभिनेत्री स्वरा भास्करची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; पोस्ट झाली व्हायरल
- पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
