🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. यावरूनच भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तसेच मोदींच्या सुरक्षेमधील त्रुटीमुळे भाजपने कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र असे असतानाच आता कॉंग्रेसने अधिकृत ट्वीटर पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तर आता यावरच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही हा व्हिडिओ रिपोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘प्रदर्शन करणारे शेतकरी १ किमी दूर होते. जे जवळ होते ते भाजप समर्थक होते. त्यामुळे मोदींचे ढोंग आता जनतेसमोर आले आहे.’ असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ‘पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.’ असे म्हटले आहे.
प्रदर्शन करनेवाले किसान एक किलोमीटर दूर थे। जो नजदीक थे वे भाजपा के लोग थे! मोदी जी का ढोंग जनता के सामने है। https://t.co/AtlwEBTChf
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 7, 2022
दरम्यान पंतप्रधान मोदींचा निदर्शकांमुके ताफा १५ ते २० मिनीटे अडकला. आणि ज्या ठिकाणी हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त २० किमी अंतरावर होते. त्यामुळे कॉंग्रेसने मोदींच्या घातपाताचा डाव आखल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र कॉंग्रेसने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात निदर्शक नाही तर भाजप समर्थकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच कॉंग्रेसने भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भाजप समर्थक भाजपचे झेंडे घेऊन मोदींच्या नावाचा जयघोष करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे भाजपने पंजाबच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंजाब माफ करणार नाही. असा इशाराही काँग्रेसने भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
