🕒 1 min read
मुंबई : टेलिव्हिजनवरील बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनानंतर त्याची खास मैत्रिण शहनाज गिल (Shahnaz Gill) खचून गेली होती. सगळ्यातून आता शेहनाज कुठे सावरत असून नुकतंच शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती सिद्धार्थ आणि पुनर्जन्माबद्दल बोलतांना दिसत आहे.
या व्हिडीओत शहनाज ही सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी ती म्हणाली, “आमचा हा प्रवास अजून व्हायचा आहे. त्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याचे कपडे बदलले आहेत, पण तो कुठेतरी आला आहे. त्याचे स्वरूप बदलले आहे, परंतु तो पुन्हा या रूपात आला आहे. त्याचे माझ्याकडील खाते सध्या तात्पुरते बंद आहे. मात्र कदाचित त्यानंतर ते पुन्हा सुरु होईल,” असे तिने सांगितले.
My conversations with @bkshivani .
???????? watch now ????????https://t.co/FY7m4ts3qF pic.twitter.com/KVBOvN8F36
— Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) January 4, 2022
दरम्यान शहनाज गिलने सिद्धार्थची बहिण बी.के शिवानीसोबत (sister bk shivani) बातचित केली. यावेळी तिच्या या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शहनाज म्हणाली की, मी सिद्धार्थला नेहमी म्हणायची की मला शिवानीशी बोलायचे आहे. मला त्या फार आवडतात. मग त्यावेळी सिद्धार्थ शहनाजला सांगायचा की ती त्याच्याशी एक दिवस नक्की बोलेल. आता त्याच्या निधनानंतर ती शिवानी सिस्टरशी बोलत आहे.“सिद्धार्थ गेला तेव्हा शेहनाज रडत होती. सिद्धार्थच्या जाण्यानंतर माझी जगण्याची इच्छा संपली होती. मी आता काय करेल,” असा प्रश्न मला पडला होता, असेही ती म्हणाली. मात्र त्यानंतर मी स्वत:ला सावरले होते. दोघं लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र यावर दोघांनी शिक्का मोर्तब केलं नव्हत. त्यानंतर दोघं काही अल्बममध्येही झळकले होते. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी देखील पसंती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
