औरंगाबाद: महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामांना परवानगी देतांना नवीन वर्षापासून दहा टक्क्यांनी विकास खर्च (बेटरमेंट चार्ज) वाढविण्यात आल्याची माहिती नगररचना विभागातील गुंठेवारी कक्षप्रमुख तथा उपअभियंता संजय चामले यांनी दिली. गुंठेवारी नियमितीकरणासाठीही दहा टक्के बेटरमेंट चार्ज वाढविण्यात आल्याने सामान्य नागरिकांवर कराचा बोजा पडणार आहे. १ जानेवारीपासून गुंठेवारीच्या दाखल होणाऱ्या संचिकांसाठी दहा टक्के बेटरमेंट चार्ज लावला जाणार आहे.
महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरण मोहीम हाती घेतली आहे. चार महिन्याच्या काळात ४ हजार ४४४ संचिका दाखल झाल्या असून त्यापैकी २११४ संचिकांना मंजूरी देण्यात आली तर ७८ संचिका नामंजूर करण्यात आल्या आहेत. यातून मनपाला ४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने १ जानेवारी या नवीन वर्षांच्या सुरूवातीलाच विकास खर्चामध्ये (बेटरमेंट चार्ज) दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ही वाढ केली जाते. मागील वर्षी विकास खर्च ११४० रुपये चौरस मिटर इतका होता.
त्यामध्ये दहा टक्के वाढ केल्यामुळे तो १२५४ रुपये चौरस मिटर इतका झाला आहे. बांधकाम परवानगीसाठी हा विकास खर्च आकारला जातो. तसेच गुंठेवारीसाठी देखील दहा टक्के विकास खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चलन भरतेवेळी मालमत्ताधारकांना ही रक्कम जमा करावी लागेल. ३१ डिसेंबरपूर्वी ज्या मालमत्ताधारकांनी चलन भरून संचिका दाखल केलेली असेल, त्या मालमत्ताधारकांना दहा टक्के वाढ लागू राहणार नाही. त्यांच्या संचिका नियमित केल्या जातील, असे गुंठेवारी कक्षप्रमुख संजय चामले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
