🕒 1 min read
मुंबई: उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गेल्या ७ वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वात अत्यंत मोठे काम झाले आहे. अत्यंत विस्मयचकित करणारे काम आहे. उत्तर प्रदेशला एक मोठी गती योगी-मोदी यांनी मिळवून दिली आहे. अशी स्तुतिसुमने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी उधळली आहेत. तसेच यावेळी त्यांनी एक मोठी माहितीही दिली आहे.
मोदी-योगींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश विकास वेग-
मोदी-योगी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशला विकासाची मोठी गती मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच निवडून येईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीत एक परिपाठी आहे की, प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यातले कार्यकर्ते तिथे मदत करण्यासाठी जातात. उत्तर प्रदेशची भाजप खूप मजबूत आहे. त्यांच्या विश्वासावरच भाजप निवडणूक जिंकणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांचे एकमेकांशी कनेक्शन आहे. अनेकांचे नातेवाईक उत्तर प्रदेशात राहतात. म्हणून महाराष्ट्रातील जवळपास सव्वाशे कार्यकर्ते मदत करण्यासाठी उत्तर प्रदेशात जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज अशाच कार्यकर्त्यांचे कोरीयेंटेशन फडणवीस यांनी घेतले.
LIVE | Addressing #BJYM State Executive Meeting in Mumbai.
भारतीय जनता युवा मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी बैठकीला मुंबई येथे संबोधित करीत आहे.@BJYM @BJYM4MH https://t.co/bPlPUeixUC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2022
मुख्यमंत्र्यांनी कोण काय बोलते यावर लक्ष देण्यापेक्षा..
दरम्यान यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवरही निशाणा साधला. राज्यातील सर्वांत भ्रष्ट शासन म्हणून ठाकरे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी कोण काय बोलते यावर लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्रावर लक्ष द्यावे. तसेच पेपर घोटाळा, नवीन विद्यापीठ कायदा अशा विविध घोटाळयावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
- “अमाप माया सोबत घेऊनी, माय चालली अनाथ करुनी!”, सदाभाऊंची भावनिक पोस्ट
- “धनंजय मुंडेंचा आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ, हे सरकार नाही तमाशाचा फड”
- ‘खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
