🕒 1 min read
औरंगाबाद : मुंबईत दररोज ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने, तेथील महापालिका प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद शहरात मंगळवारी तब्बल ८७ कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ६ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत शहरातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी बुधवारी(दि. ५) काढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने, अगोदर ग्रामीण भागातील शाळा उघडण्यात आल्या. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद शहरातील शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली. शाळा सुरू होऊन महिनाही झालेला नसताना, पुन्हा कोरोना उद्रेक सुरू झाला आहे. चार दिवसांपासून शहरात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. मंगळवारी रुग्णवाढीचा अचानक उद्रेक झाला. काही दिवसांपूर्वी शहरातील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने कोणताही विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला नाही. मात्र यामुळे पालकांची चिंता वाढली होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता आयुक्तांनी पहिली ते आठवी चे वर्ग बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.
मात्र ऑनलाइन शिक्षण सुरु राहणार आहे. ९ वी १२ वी पर्यंतचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांचा जमाव कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसाधारण उपायोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने आदेश काढण्यात आल्याचे म्हणले आहे. सर्व माध्यमांना हा आदेश लागू आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
