🕒 1 min read
मुंबई: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. असे असले तरी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी मात्र कोरोनाच्या सर्व नियमांची पायमल्ली केली आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. विशेष म्हणजे स्वतः धनंजय मुंडेंनी देखील मास्क घातला नव्हता. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar)यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘राज्य सरकार रोज कडक निर्बंध लावते आहे, मास्क नसणाऱ्यांना जबर दंड ठोठावत आहे, लॉकडाऊनची भीती घालत आहे आणि तिथे अनेक मंत्री, आमदार कोरोना पॉझिटिव्ह होऊनही धनंजय मुंडेंनी पक्षप्रवेश कार्यक्रमात आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासला आहे. हे सरकार नाही तमाशाचा फड आहे.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केली आहे.
राज्य सरकार रोज कडक निर्बंध लावते आहे, मास्क नसणाऱ्यांना जबर दंड ठोठावत आहे, लॉकडाऊनची भीती घालत आहे आणि तिथे अनेक मंत्री, आमदार कोरोना पॉझिटिव्ह होऊनही धनंजय मुंडेंनी पक्षप्रवेश कार्यक्रमात आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासला आहे.
हे सरकार नाही तमाशाचा फड आहे. pic.twitter.com/6bMlUZuOCp— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 5, 2022
दरम्यान आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आतापर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आजच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून या सर्वाना कोरोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
