🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील कोरोना संकट, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, विविध परीक्षा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचार यासह मुख्यमंत्र्यांची हिवाळी अधिवेशनाला गैरहजेरी यासह विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. त्यांना आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे, ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,’ असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले आहेत.
तसेच उद्धव ठाकरेंनी आपल्या विभागात झालेल्या काामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना दिल्या. आपण केलेल्या विकासकामाची पोचपावती मिळायला हवी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं-अजित पवार
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
