🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांना मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णसंख्येने जर २० हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी दिला आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’यासर्व परिस्थितीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांचे लक्ष असून आपण जी यंत्रणा उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे. आज कुणालाही लॉकडाउन नकोय, निश्चितच लॉकडाउन असताच कामा नये. परंतु जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल’,असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.
We will have to impose lockdown in Mumbai if daily COVID cases cross the 20,000-mark: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/7AV7fMSjS0
— ANI (@ANI) January 4, 2022
दरम्यान, या मुद्द्यावरून प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना इकबाल चहल म्हणाले की,’मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला कोरोनापासून दूर कसं राहता येईल हे पाहावे. महापालिकेकडे ३० हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या असून औषधे आणि व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन संदर्भात केंद्राने निर्णय घेतला; अजित पवारांची माहिती
- अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील हटवलेले ‘ते’ दृश्य पुन्हा प्रदर्शित
- “आव्हाड प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार”,आ. पडळकरांची खोचक टीका
- राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ कोरोनाचा शिरकाव
- “कोहलीला सचिन तेंडुलकरच्या मार्गाने जाण्याची गरज नाही, कारण…”; माजी क्रिकेटपटूचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
