Share

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ कोरोनाचा शिरकाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील बरेच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) निवास स्थानी म्हणजेच शिवतीर्थावर देखील कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज ठाकरेंनी पुढील दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तातडीने इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल अजून येणे बाकी आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी पुढील दहा दिवसांसाठी रद्द केल्या असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!