🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse-Khewalkar))यांच्या वाहनावर काल (२७ डिसेंबर) अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेवरूनच राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Thombre Patil) यांनी हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञात लोकांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला, सदर भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध… ! सत्यता तपासून योग्य कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञात लोकांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला, सदर भ्याड हल्ल्याचा
जाहिर निषेध… ! सत्यता तपासून योग्य कारवाई व्हावी @AjitPawarSpeaks pic.twitter.com/dad2E8w6dh— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 27, 2021
दरम्यान रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि चालक होता. दरम्यान रोहिणी खडसे या सुखरूप असून राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांनी हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; 174 संपकऱ्यांना केलं बडतर्फ
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
