🕒 1 min read
नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटने (Joe Root) आपल्या खात्यात आणखी एक मोठी कामगिरी जमा केली आहे. एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम रूटच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथलाही (Graeme Smith) मागे टाकत त्याने ही कामगिरी केली आहे.
मेलबर्नमध्ये झालेल्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत रूटने हा विक्रम केला. रूटने या वर्षात आतापर्यंत 1680 धावा केल्या आहेत आणि 2008 मध्ये माजी प्रोटीज कर्णधाराचा 1656 धावांचा विक्रम मोडला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंडचा कर्णधार सध्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ (2006 मध्ये 1788 धावा) आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स (1976 मध्ये 1710 धावा) यांच्या पुढे आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
