Share

हे सरकार नक्की कोण चालवत आहे? भरती घोटाळ्यावरून भाजपचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात टीईटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झालेला घोटाळा चर्चेत असतानाच टीईटी लागू झाल्यानंतर राज्यभरात हजारो शिक्षक नियुक्तीचा मोठा घोटाळा झाला असून, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या घोटाळ्याबाबत माहिती दिली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

‘राज्यात टीईटीपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला असून थेट भरती बंद असताना हजारो शिक्षक नेमले गेले आहेत. फक्त घोटाळे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. यांना अपरिमित भ्रष्टाचारासाठी सत्ता हवी होती, गोरगरिबांच्या कल्याणासाठी नाही. हे सरकार नक्की कोण चालवत आहे?’ असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान टीईटी अट २०१३ साली लागू झाली आणि थेट शिक्षकभरती बंद झाली. मात्र, यातून पळवाट काढत अनेक संस्थांनी ‘सदर शिक्षक २०१२ पूर्वीपासूनच आमच्या शाळेत काम करत होते’, असे रेकॉर्ड तयार करून आणि अधिकार्‍यांना पैसे देऊन या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता मिळवली असल्याचा दावा हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने टीकासत्र सुरु केले आहे.

सदरील घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांची संख्या किमान ५०० ते १ हजार असल्याचा अंदाज आहे. शिक्षकभरती बंद असताना ही शिक्षकभरती झाली कशी? टीईटी पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!