🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची २५ डिसें.रोजी जयंती होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे हे अभियान चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींत लोकांच्या देणग्यांचेच पाठबळ मिळत राहिले, पण इतर सर्व आणि भाजपमध्ये फरक आहे. भाजपवर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा. भाजप हा सत्तेत नव्हता तेव्हा ‘शेठजीं’चा पक्ष अशीच त्याची ओळख राजकारणात होती. ही ओळख शिवसेनेशी मैत्री झाल्यावर पुसली गेली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर, अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला. भाजप त्याआधी काय होता हे काय कुणाला माहीत नाही? ते काही असले तरी भाजपचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले, याचे कुणाला दुःख होण्याचे कारण नाही. तरीही भारतीय जनता पक्षाने आता लोकांकडून पाच रुपयांपासून, ५०, १००, ५०० व एक हजार रुपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, पण भाजपने २०१९-२० सालात ३,६२३,२८ कोटी रुपयांची ‘संपत्ती’ जाहीर केली आहे. भाजपचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे. तसे इतर पक्षांचेही आहे. २०१४ पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली हे काही लपून राहिलेले नाही कधी काळी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हीच बरकत होती,’असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- विधानसभा निवडीबाबत आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा; राज्यपाल म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
